Join Our WhatsApp Group

उद्या अधिक मासातल्या पौर्णिमेला या जागेवर फक्त एक स्वस्तिक काढा, चमत्कार नक्की घडून येईल

नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ

उद्या अधिक मासातील पौर्णिमा आहे. तर या पौर्णिमेला आपल्याला एका ठिकाणी स्वतिक काढायचा आहे. ते स्वस्तिक कस आणि का काढायचं आहे याची माहिती घेऊया. माहित करून घेतल्यावर तुम्ही नक्कीच स्वस्तिक काढलं अशी अपेक्षा ठेवून माहितीला सुरवात करूयात.

मित्रानो भगवान विष्णूंना अधिक मास समर्पित असतो. सोबतच पौर्णिमा तिथी जी आहे ती माता लक्ष्मीला खुप प्रिय मानली गेली आहे. त्यामुळे हा दिवस किती शुभ आहे हे तुमच्या लक्षात आलेच असेल. जिथे भगवान विष्णू असतात तिथे माता लक्ष्मी असते.

त्यामुळे जर आपण या दिवशी काही प्रभावी उपाय केले तर त्याचा आपल्या जीवनात खूप मोठा फायदा होतो. श्री हरी विष्णूंना आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपण जर हे छोटे छोटे उपाय केले तर भगवान विष्णू प्रसन्न होऊन आपल्यावर कृपा करतात.

स्वप्न शास्त्र : या गोष्टी स्वप्नात दिसल्या तर समजून जा तुमचा चांगला काळ सुरु होणार.

मित्रांनो अधिक महिना हा दरवर्षी नसतो. हा महिना 33 महिन्यांनी येत असतो. म्हणून उद्याचा दिवस जो आहे तो चांगली संधी म्हणून आपल्याकडे आलेला आहे. तर या पौर्णिमेला खुप महत्व आहे. पौर्णिमा तिथी दार महिन्याला असते. त्यामुळे कंटाळा न करता महिलांना विनंती आहे कि हा उपाय वेळात वेळ काढून नक्की करा.

उद्या पौर्णिमा रात्री 12 वाजून 2 मिनिटांपर्यंत आहे. त्यामुळे जो काही उपाय आम्ही सांगणार आहोत तो उद्याच्या दिवशीच करायचा आहे. मित्रांनो स्वस्तिक हे शांती , समृद्धी आणि मांगल्याचे प्रतीक आहे आणि चातुर्मासात देखील स्वस्तिक व्रत केले जाते.

यावेळेस अधिक महिना हा श्रावणाच्या आधी आल्यामुळे चातुर्मास सुद्धा पाच महिन्यांचा आहे त्यामुळे बऱ्याच महिला स्वस्तिक व्रत करतात. चातुर्मासात स्वस्तिक देव्हाऱ्याजवळ , मुख्य दरवाजवळ काढू शकता आणि त्या स्वतिकची तुम्हाला पूजा करायची असते. असं म्हणतात कि या चातुर्मासात जी स्त्री रोज स्वस्तिक काढते तिला कोणत्याही प्रकारचं दुःख , संकटाच भय नसत.

अशा स्त्रीच्या आयुष्यात नेहमी मंगलमय गोष्टी घडत राहतात. आणि तीच जीवन जे आहे ते खूप सुखी असत. मित्रानो अनेकांना पूर्ण चातुर्मासात हे स्वस्तिक व्रत करणे शक्य होत नाही. कारण आजकाल स्त्रिया बाहेर काम करतात त्यामुळे अनेक महिलांना हे शक्य होत नाही. त्यामुळे उद्याचा दिवस हा खूप महत्वाचा दिवस आहे.

तर मित्रांनो उद्याच्या पौर्णिमेला तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाजवळ हे स्वस्तिक काढायचं आहे. उद्या सकाळी जेव्हा तुम्ही उठाल तेव्हा घराचा मुख्य दरवाजा स्वच्छ कापडाने पुसायचा आहे. जमल्यास उंबरठ्यावर हळदीचं लेपन नक्की करा. उंबरठ्यावर हळदी , कुंकू अक्षदा अर्पण करा.

गाईचं थोडस तूप घ्या , त्यात थोडीशी हळद मिसळा आणि त्या हळदीने तुम्हाला हे स्वस्तिक रेखाटायचं आहे. बारीक पाहिलं तर अगदी छोटीशी गोष्ट आहे. परंतु मित्रानो हे स्वस्तिक नकारात्मक गोष्टीं घरात येण्यापासून आपले रक्षण करते आणि आपल्या घरात मंगलमय वातावरण नेहमी राहावं यासाठी ते मदत करत.

स्वस्तिक काढताना चुकवू नका. अगदीच चांगलं आल पाहिजे असं काही नाही. मनापासून केलेली भक्ती वेडी वाकडी असली तरी भगवंतापर्यंत पोहोचतेच. उद्याची पौर्णिमा खूप महत्वाची आहे त्यामुळे हा दिवस वाया जाऊ देऊ नका. हा छोटासा उपाय नक्की करा.

स्वस्तिक माता लक्ष्मीला आकर्षित करते. या दिवशी माता लक्ष्मीचा प्रभाव सर्वत्र असतो. म्हणून आपण जर असं स्वस्तिक आपल्या मुख्य दरवाजावर रेखाटलं तर माता लक्ष्मी आपल्या घरावर प्रसन्न होते. मातेचा आशीर्वाद कायम आपल्या घरातील व्यक्तींवर राहतो त्यामुळे आपल्याला आयुष्यात कशाची म्हणून कमतरता भासत नाही.