Join Our WhatsApp Group

Kamdhenu : शास्त्रानुसार कामधेनूची मूर्ती या दिशेला ठेवा, घरात सुख-समृद्धी नांदेल

Kamdhenu : कामधेनू ही मुळात स्वर्गात राहणारी दैवी गाय आहे. हिंदू धर्मात कामधेनू गाईला अत्यंत पूजनीय मानले गेले आहे. समुद्रमंथनाच्या वेळी कामधेनू गायीची उत्पत्ती झाली अशी पौराणिक मान्यता आहे. या कारणांमुळे कामधेनू गाईची मूर्ती स्थापित करणे खूप शुभ मानले जाते. परंतु कामधेनू गाईची मूर्ती ठेवण्याचे काही नियम शास्त्रात सांगितले आहेत.

हिंदू धर्मात वास्तुशास्त्राला खूप महत्त्व दिले गेले आहे. वास्तुशास्त्रानुसार घरातील प्रत्येक कोपरा काही ना काही सांगत असतो. घरातील वस्तू योग्य दिशेला ठेवणे अत्यंत आवश्यक असते. कामधेनू ही सर्व इच्छा पूर्ण करणारी गाय असल्याचे पुराणात वर्णन आहे.

तर दुसरीकडे कामधेनूची मूर्ती घरात ठेवल्यास जीवनात सुख, समृद्धी आणि शांती लाभते. चला तर मग जाणून घेऊया कामधेनू गाईची मूर्ती कोणत्या दिशेला ठेवणे वास्तुशास्त्रानुसार फायदेशीर आहे.

Shukra Gochar 2023 : शुक्राचा कर्क राशीत प्रवेश, या 3 राशींच्या लोकांना संकटांचा सामना करावा लागणार.

Kamdhenu मूर्ती ठेवण्याचे फायदे

असे मानले जाते की कामधेनू गाईच्या मूर्तीच्या केवळ दर्शनाने व्यक्तीच्या मनात सकारात्मक ऊर्जा येते. कामधेनू गाईची मूर्ती माणसाच्या मनातील चिंता आणि तणाव दूर करण्यास मदत करते.

या दिशेला मूर्ती ठेवा

घराच्या ईशान्य दिशेला कामधेनूची मूर्ती ठेवणे शुभ मानले जाते. कामधेनूची मूर्ती तुम्ही तुमच्या मंदिराजवळही ठेवू शकता. तसेच, हे लक्षात ठेवा की गाईची मूर्ती अशा ठिकाणी ठेवू नका जिथून ती कोणालाही दिसणार नाही. त्यापेक्षा अशा ठिकाणी ठेवा जिथून सर्वजण तिचे दर्शन घेतील.

व्यवसायात वाढ

व्यवसायात समृद्धी मिळवण्यासाठी तुम्ही तुमच्या ऑफिसच्या सीटच्या उजव्या किंवा डाव्या बाजूला कामधेनू मूर्ती ठेवू शकता. ज्या ठिकाणी आपण आपले पैसे ठेवतो जसे कि तिजोरी , लॉकर. या ठिकाणी कामधेनू गायीची मूर्ती ठेवल्यास अगणित फायदे होतात.

या ठिकाणी मूर्ती ठेवू नये

कामधेनूची मूर्ती कधीही शौचालयाजवळ ठेवू नये, तसेच कामधेनूचे फोटो शौचालयाजवळ ठेवू नये. तसेच काचेच्या शोकेसमध्ये ठेवू नये. आरशात तिचे प्रतिबिंब दिसेल अशा प्रकारे मूर्ती ठेवू नका. तसेच घरात कामधेनूची एकच मूर्ती असावी हे ध्यानात ठेवा.

वरील माहिती धार्मिक मान्यतेवर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. केवळ समाज मान्य उपाय आपल्या पर्यंत पोहोचावे एवढाच आमचा हेतू आहे.