Join Our WhatsApp Group

असा असतो मेष राशीच्या महिलांचा स्वभाव

नमस्कार मित्रांनो , आज आपण मेष राशीच्या स्त्रियांचा – महिलांचा स्वभाव व गुणवैशिष्ट्यांबाबत संपूर्ण माहिती घेणार आहोत. मेष राशीचा स्वामी हा मंगळ ग्रह आहे. स्त्रियांना तसेही मेष राशी फार योग्य नाही. कारण मेष राशीत स्त्रियांना लागणारे दया, प्रेम, नाजूकपणा, कोमल पणा, वात्सल्य, संसार हे गुण थोडे कमी प्रमाणात आढळून येतात असे अनेकदा दिसून येत असतं.

मेष राशीच्या महिला थोड्या भांडखोर स्वभावाच्या, हट्टी स्वभावाच्या, तापट, रागीट स्वभावाच्या असतात. मात्र या स्त्रिया करारी व कर्तृत्ववान स्वभावाच्या देखील असतात आणि आपल्या वैवाहिक जोडीदाराला प्रत्येक कठीण प्रसंगी साथ देणाऱ्या असतात मदत करणाऱ्या असतात. अस अनेकदा मेष राशीच्या स्त्रियांच्या बाबतीत दिसून येत असतं.

मेष राशीच्या स्त्रियांना बॉबकट, बेल बॉटम अशा पुरुषी पोशाखाची प्रचंड प्रमाणात आवड असलेली दिसून येत असते. थाटात राहणं यांना आवडत असतं. मेष राशीच्या तरुण मुलींना मित्रांसोबत फिरण्याची खूप प्रमाणात आवड असलेले दिसून येत असते.

मेष राशीच्या स्त्रियांना घरकाम व कला कौशल्याची आवड थोडी कमी प्रमाणात असते. आपल्या वैवाहिक जोडीदाराबरोबर हॉटेलमध्ये जाणे वगैरे यांना खूप आवडत असते अस अनेकदा दिसून येत असतं.

मेष राशीच्या स्त्रियांना मसालेदार तिखट पदार्थ तयार खाण्याची खूप आवड असते. त्यामुळे अनेकदा उष्णतेचे विकार होण्याची शक्यता या राशीच्या स्त्रियांमध्ये दिसून येते. यांनी थोडे मसालेदार पदार्थ खाणे टाळावे.

मेष राशीच्या महिलांनी आपल्या रागावर, आपल्या बोलण्यावर व आपल्या स्पष्ट वक्तेपणावर संयम ठेवणे आवश्यक आहे. म्हणजे वैवाहिक जीवनात समस्या उत्पन्न होणार नाहीत.

तसेच मेष राशीच्या गृहिणीने आपल्या मुलांनी आपण जसं सांगू तसंच वागल पाहिजे, तेच शिक्षण घेतलं पाहिजे किंवा आपल्या सासू-सासर्‍यांनी आपल्या वैवाहिक जोडीदारने आपण जसं म्हणू तसंच वागलं पाहिजे हा स्वभाव थोडा टाळला पाहिजे.

त्याच्यामुळे तुमच्या संसारामध्ये प्रॉब्लेम्स क्रिएट होत असतो. हे टाळलं तर तुमचा संसार नक्कीच सुखाचा होईल आणि सर्व प्रकारच्या अडचणी तुमच्या कमी होत जातील. मेष राशीच्या महिलांना सतत डोकेदुखीचा किंवा अपचनाचा त्रास होण्याची शक्यता असते.

असा त्रास जास्त व्हायला लागल्यावर लगेच डॉक्टरांची ट्रीटमेंट व सल्ला घेऊन यावा म्हणजे तुम्हाला फायदा होईल. मेष राशीच्या महिलांनी गणपतीची जास्तीत जास्त उपासना करावी.

ओम गं गणपतये नमः या मंत्राचा जप करावा. तुम्हाला नक्कीच फायदा झालेला दिसून येईल. आजची माहिती आपणास कशी वाटली आपल्या प्रतिक्रिया कमेंट्स द्वारे कळवायला विसरू नका.

मेष राशीचा भाग्यवान अंक 9, 8 आणि 6 आहेत. मेष राशीचा लकी कलर निळा आणि हिरवा आहे. मेष राशीसाठी शुक्रवार, मंगळवार आणि शनिवार शुभ मानले जातात. मेष राशीच्या लोकांना वृषभ, कर्क, कन्या आणि मकर राशीची साथ मिळत नाही.

प्रेमाच्या बाबतीत, मेष राशीच्या स्त्रिया हुकूमशाही दर्शवतात. यांना जोडीदारावर वर्चस्व गाजवायला आवडते. मेष राशीच्या महिला प्रेमाच्या बाबतीत खऱ्या आणि प्रामाणिक असतात. या महिला प्रेमासाठी पूर्णपणे समर्पित राहतात.

या महिला बाहेरून मजबूत दिसतात पण आतून कमकुवत असतात. त्यांच्या जोडीदाराने नेहमी त्यांची काळजी घ्यावी असे त्यांना वाटते. एकदा का त्यांचा जोडीदारावर विश्वास बसला की ते त्यांच्यासमोर खुले पुस्तक बनून जातात.