Join Our WhatsApp Group

Rahu Ketu Gochar 2023 : दीड वर्षानंतर राशी बदलणार. या चार राशीच्या लोकांची उलटी गिनती सुरु.

Rahu Ketu Gochar 2023 : ज्योतिष शास्त्रानुसार राहू आणि केतू हे छाया ग्रह आहेत. राहू-केतू दीड वर्षांनी राशी बदलणार आहेत. राहू आणि केतूला क्रूर ग्रह म्हणून देखील ओळखले जाते. राहू केतू या वर्षी 30 ऑक्टोबर 2023 रोजी गोचर करतील. या गोचराचा सर्व राशींवर सकारात्मक अथवा नकारात्मक प्रभाव पडेल. पण चार राशींवर सर्वात जास्त नकारात्मक परिणाम होईल. जाणून घेऊया त्या 4 राशींबद्दल.

Rahu Ketu Gochar 2023 : गोचर कधी होणार ?

ऑक्टोबर महिन्यात जन्मलेल्या व्यक्तींचा स्वभाव कसा असतो ? प्रेम, व्यवसाय, नोकरी.

ज्योतिष पंचांगानुसार, 30 ऑक्टोबर 2023 रोजी दुपारी 01:33 वाजता राहू मेष राशी सोडून मीन राशीत प्रवेश करेल. त्याच वेळी केतू तूळ राशीतून बाहेर पडून कन्या राशीत प्रवेश करेल. सध्या राहू मेष राशीत तर केतू तूळ राशीत विराजमान आहे.

मिथुन रास

राहू आणि केतूच्या संक्रमणामुळे मिथुन राशीच्या लोकांच्या कुटुंबात कलह निर्माण होऊ शकतो. व्यवसायात नुकसान होऊ शकते. एकंदरीत मिथुन राशीच्या लोकांसाठी येणारा काळ चढ-उतारांचा असेल. स्वतःच्या निर्णय क्षमतेने परिस्थिती अनुकूल राहील तरीही सावधगिरी बाळगणे महत्वाचे ठरेल.

कर्क रास

ज्योतिषांच्या मते राहू आणि केतूच्या राशी बदलामुळे कर्क राशीच्या लोकांना ऑफिसमध्ये अडचणींचा सामना करावा लागू शकतो. यासोबतच राजकारणात सक्रिय असलेल्या लोकांना राजकीय दबावाला सामोरे जावे लागू शकते. नोकरीसाठीही तुम्हाला अधिक संघर्ष करावा लागू शकतो.

तूळ रास

Saptagrahi Yog : या राशींचे लोक आता वाऱ्याच्या वेगाने धावणार. बक्कळ पैसा कमावणार.

यावेळी तूळ राशीच्या लोकांना खूप सावध राहण्याची गरज आहे. या काळात तुमच्या व्यवसायात नुकसान होण्याचीही शक्यता आहे. वैवाहिक जीवनात तणाव निर्माण होऊ शकतो. जर तुम्ही एखाद्या कामाच्या संदर्भात बाहेर जाण्याचे नियोजन करत असाल तर ते पुढे ढकला, तुम्हाला कामात यश मिळणार नाही.

मकर रास

मकर राशीच्या लोकांनी त्यांच्या पालकांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. कुटुंबात काही मुद्द्यावरून मतभेद होऊ शकतात. जर तुम्ही मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आधी त्यावर सखोल संशोधन करा अन्यथा तणाव निर्माण होऊन नुकसान होऊ शकते.