Join Our WhatsApp Group

Shukra Gochar 2023 : शुक्र 2 ऑक्टोबरला सिंह राशीत प्रवेश करणार, या 4 राशींना आर्थिक लाभ होणार.

Shukra Gochar 2023 : सध्या दैत्यांचा गुरु शुक्र कर्क राशीत विराजमान आहेत. पुढील महिन्यात 2 ऑक्टोबरला शुक्र कर्क राशीतून बाहेर निघून सिंह राशीत प्रवेश करेल. शुक्राच्या राशीतील बदलाचा सर्व राशींवर अनुकूल परिणाम होईल. शुक्राच्या राशी बदलामुळे 4 राशीच्या लोकांचे उत्पन्न वाढणार आहे.

सनातन धर्मात ज्योतिषशास्त्राला विशेष महत्त्व आहे. ज्योतिषशास्त्र ग्रहांची स्थितीनुसार भविष्याची गणना करते. जेव्हा व्यक्तीच्या कुंडलीत शुक्राची स्थिती मजबूत असते तेव्हा व्यक्तीला सर्व प्रकारची भौतिक सुखे प्राप्त होतात. सध्या दानवांचा स्वामी शुक्र कर्क राशीत विराजमान आहे.

Rahu Gochar 2023 : पापी ग्रह राहूचा मीन राशीत प्रवेश. या 3 राशींचे होणार नुकसान.

ज्योतिषीय पंचांगानुसार शुक्र 2 ऑक्टोबर रोजी पहाटे 1:02 वाजता सिंह राशीत प्रवेश करेल. यादरम्यान 17 ऑक्टोबरला पूर्वा फाल्गुनी नक्षत्रात आणि 30 ऑक्टोबरला उत्तरा फाल्गुनी नक्षत्रात प्रवेश करेल. यानंतर 3 नोव्हेंबर रोजी कन्या राशीत प्रवेश करेल.

कर्क रास

गुरु आणि शुक्र हे दोन्ही शुभ ग्रह आहेत. कुंडलीत गुरू आणि शुक्र बलवान असल्यामुळे व्यक्तीच्या आयुष्यात खूप प्रगती होते. सिंह राशीत शुक्राच्या संक्रमण धनाच्या घरात होणार आहे. या घरात गुरू आणि शुक्र असल्यास व्यक्तीला धनाची प्राप्ती होते. तसेच सर्व भौतिक इच्छा पूर्ण होतात. कर्क राशीत बृहस्पति उच्च आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना आगामी काळात आर्थिक लाभ होऊ शकतो.

तूळ रास

तूळ राशीचा स्वामी शुक्र आहे आणि देवता माता दुर्गा आहे. सिंह राशीत गोचरादरम्यान शुक्र तूळ राशीच्या अकराव्या घरात असेल. तूळ राशीच्या लोकांना या घरात शुक्र असल्यामुळे आर्थिक फायदा होईल. नोकरी मिळण्याची शक्यता वाढेल. उत्पन्न आणि सौभाग्य वाढेल. पितृ पक्षानंतर तुम्ही वाहन खरेदी करू शकता.

वृश्चिक रास

शुक्र आपली राशी बदलून वृश्चिक राशीच्या करिअर घराकडे असेल. या काळात वृश्चिक राशीच्या लोकांना करिअर आणि बिझनेसमध्ये नवा आयाम मिळेल. त्यामुळे आर्थिक लाभ होण्याची शक्यता निर्माण होईल. कुटुंबात सुख-शांतीचे वातावरण राहील. बिघडलेली कामे मार्गी लागतील. अविवाहित लोकांचे विवाह जुळून येतील. अडकलेले पैसेही परत मिळू शकतात.

धनु रास

या काळात धनु राशीच्या लोकांनाही फायदा होईल. भगवान शुक्र धनु राशीच्या भाग्यस्थानात स्थित असेल. या घरामध्ये शुभ ग्रहांच्या दृष्टीमुळे व्यक्तीला नशिबाची पूर्ण साथ मिळते. त्यामुळे धनु राशीच्या व्यक्तीची सर्व कामे पूर्ण होतील. तुम्हाला अचानक धनलाभ होऊ शकतो. नोकरीत बढती होईल.