Join Our WhatsApp Group

शंकराच्या पिंडीवर चुकून सुद्धा असे बेलपत्र अर्पण करू नका, भोगावे लागतील गंभीर परिणाम

बेलपत्र : मित्रांनो श्रावण महिना भगवान शंकराला समर्पित आहे. या संपूर्ण महिन्यात भाविक भगवान भोलेनाथांची भक्तिभावाने पूजा करतात आणि त्यांना प्रसन्न करण्यासाठी विविध उपाय , पूजा विधी आणि पाठ करताना दिसतात. शास्त्रात असे मानले जाते की भगवान शंकराला प्रिय वस्तू अर्पण केल्याने ते प्रसन्न होतात. भगवान शंकराच्या पूजेमध्ये अनेक गोष्टी अर्पण केल्या जात असल्या तरी बेलपत्र हे सर्वात महत्त्वाचे आहे.

भगवान शंकराच्या सर्वात आवडत्या गोष्टींपैकी एक, बेलपत्राचे स्थान पहिले आहे. असे मानले जाते की बेलपत्राशिवाय भगवान शंकराची पूजा अपूर्ण आहे. म्हणूनच भगवान शंकराच्या पूजेमध्ये बेलपत्र अर्पण करणे सर्वात महत्वाचे आहे. पण बेलपत्र अर्पण करताना काही खास गोष्टींची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. ते अर्पण करण्यासाठी काही विशेष नियम आहेत, ज्यांचे पालन करणे फार महत्वाचे आहे. आज आम्ही तुम्हाला याबद्दल सांगणार आहोत.

चुकूनही शिवलिंगावर असे बेलपत्र अर्पण करू नका.

बेलपत्र

जर तुम्ही शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करत असाल तर त्या काळात तुम्हाला बेलपत्राची निवड अत्यंत काळजीपूर्वक करावी लागेल. शिवलिंगावर जे बेलपत्र अर्पण करायचे आहे ते कोठूनही फाटलेले , तुटलेले नसावे हे ध्यानात ठेवावे. यासोबतच त्यावर जास्त पट्टे नसावेत. अनेक बेलपत्राच्या पानांवर वर्तुळे आणि पट्टे असतात, ज्याचा उपयोग भगवान शंकराच्या पूजेमध्ये करू नये. कारण असे मानले जाते की चक्र आणि वज्र असलेले बेलपत्र खंडित आहे.

लग्नानंतर प्रत्येक पत्नी पतीपासून या 5 गोष्टी लपवून ठेवते, जाणूनबुजून पतीला मूर्ख बनवते

जर तुम्ही शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करत असाल तर त्यादरम्यान तुम्ही विशेष काळजी घ्यावी की बेलपत्र अर्पण केल्यानंतर धान्य, तेल, दूध यासारख्या वस्तू पुन्हा अर्पण करू नयेत. जर तुमच्याकडे अनेक बेलपत्र नसतील तर अशा स्थितीत तुम्ही एकच बेलपत्र शिवलिंगाला अर्पण करू शकता. यासोबतही तुमच्या उपासनेचे तेच फळ मिळेल. शिवलिंगावर कधीही जल अर्पण केल्याशिवाय बेलपत्र अर्पण करू नये हे लक्षात ठेवा.

शास्त्रात बेलपत्र तोडण्याचा नियमही सांगण्यात आला आहे. सोमवारी किंवा चतुर्दशीला बेलपत्र कधीही तोडू नये. आवश्यक असल्यास, ते अगोदर तोडून घ्यावे. असे मानले जाते की सोमवार आणि चतुर्दशीला बेलपत्र तोडून शिवलिंगावर अर्पण केल्यास भगवान शंकर कोपतात.

या प्रकारे शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करा

जर तुम्ही शिवलिंगावर अर्पण करण्यासाठी बेलपत्र घेत असाल तर तुम्हाला स्वच्छ आणि शुद्ध बेलपत्र निवडावे लागेल. बेलपत्राची पाने पूर्णपणे ताजी असावीत हे लक्षात ठेवावे. शिवलिंगावर बेलपत्र नेहमी गुळगुळीत बाजूने ठेवावे. बेलपत्रांना सूर्यप्रकाशात जास्त वेळ ठेवल्याने ते काळपट होतात. त्यामुळे सूर्यकिरणांपासून बेलपत्राचे रक्षण करावे.

बेलपत्रात जितकी जास्त पाने असतील तितके ते चांगले असते असे शास्त्रात नमूद केले आहे. म्हणूनच भगवान शंकराला बेलपत्र अर्पण करताना ते कमीतकमी 3 पानांचे असले पाहिजे. मित्रानो बेलपत्र 1, 3 किंवा अगदी 5 पानांचे देखील असते. शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करताना “ओम नमः शिवाय” किंवा इतर शिव स्तुती मंत्राचा जप करावा.