Join Our WhatsApp Group

गुरुवारी जी व्यक्ती स्वामींचे हे उपाय करते ती कधीच गरीब राहत नाही

नमस्कार मित्रांनो , श्री स्वामी समर्थ

मित्रांनो आज आपण गुरुवारी संबंधी माहिती जाणून घेणार आहोत. गुरुवार म्हटलं कि आपल्या स्वामी भक्तांसाठी विशेष दिवस असतो. गुरुवारचा दिवस स्वामी महाराजांना समर्पित आहे तसेच विष्णू भगवानांना देखील समर्पित आहे. विष्णू भगवान जर आपल्यावर प्रसन्न झाले तर लक्ष्मीची कृपा दृष्टी आपल्यावर व्हायला वेळ लागत नाही.

मित्रानो गुरुवारी सकाळी उठल्यानंतर आंघोळीच्या पाण्यात आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे आणि हळदीच्या पाण्याने आंघोळ करायची आहे. रोज असे केले तर उत्तमच. पण जर रोज शक्य होत नसेल तर गुरुवारी मात्र हे एक काम आपल्याला आवर्जून करायचं आहे.

अशा पुरुषांनी चुकूनही वयाने लहान असलेल्या मुलीशी लग्न करू नये.

मित्रांनो हळदीला जेवढे आयुर्वेदात महत्व आहे तेवढेच महत्व धार्मिक गोष्टींमध्ये देखील आहे. त्यामुळे आपल्याला हळदीचा वापर गुरुवारी जास्तीत जास्त करायचा असतो. आंघोळ झाल्यावर हळदीने आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर हळदीचे लेपन करायचं आहे. रोज केले तरी हरकत नाही. मासिक पाळीत मात्र या गोष्टी करू नयेत.

गुरुवारच्या दिवशी घराची फरशी पुसताना पाण्यात हळद , गोमूत्र आणि जाड मीठ टाकून फरशी स्वच्छ करायची आहे. अंगणात देखील या पाण्याचा सडा मारायला काहीही हरकत नाही. याने घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर पडण्यास मदत होते.

सोबतच स्वामी चरित्राच पारायण करायचं आहे. तसेच दर गुरुवारी जर विष्णू सहस्रनामम वाचलं तर त्याचे खूप छान अनुभव लोकांना आलेले आहेत. विष्णू सहस्रनामम वाचल्याने भगवान विष्णूंचा आशीर्वाद आपल्याला भरभरून मिळत असतो. रोज शक्य होत नसेल तर निदान गुरुवारी तरी विष्णू सहस्रनामम जरूर वाचावे.

स्वप्न शास्त्र : या गोष्टी स्वप्नात दिसल्या तर समजून जा तुमचा चांगला काळ सुरु होणार.

गुरुवारच्या दिवशी गाईला गूळ आणि चणा डाळ खाऊ घालायची आहे. प्रत्येक ठिकाणी गाई असतीलच असे नाही परंतु आजूबाजूला गोठा असेल किंवा मंदिर असेल तिथे बाहेर गाई असतात अशा ठिकाणी जाऊन आपल्याला हा उपाय करायचा आहे. हा उपाय केल्याने पैशांशी संबंधित अडचणी दूर होण्यास मदत होते.

गाईला चपाती देखील खाऊ घालायची आहे. पण लक्षात घ्या कि चपाती मध्ये आपल्याला हळद लावून गाईला खाऊ घालायची आहे. गुरुवारच्या दिवशी पिवळ्या वस्तूंचं दान देखील करणे शुभ मानले जाते. दान धर्म करणे प्रत्येकाच्या आर्थिक परिस्थितीवर अवलंबून असत. कितीही इच्छा असली तरी काही गोष्टी या अशा असतात ज्या इच्छा असून देखील करता येत नाहीत.

परंतु फुल ना फुलाची पाकळी तरी आपण नक्कीच दान म्हणून देऊ शकतो. तुमची परिस्थिती असेल तर नक्कीच तुम्ही गरजूंना वस्त्र दान तर करूच शकता. मित्रांनो अपेक्षा न ठेवता केलेली सेवा आपल्याला आयुष्यात बरच काही देऊन जाते. त्यामुळे गरज आहे म्हणूनच सेवा किंवा उपाय करायचे नसतात तर काही गोष्टी अपेक्षा न ठेवता करायच्या असतात.