Join Our WhatsApp Group

उद्या संकष्टी चतुर्थी, कापुरासोबत जाळा ही एक वस्तू . कीतीही मोठ्या अडचणी असल्या तरी मार्ग मिळेल.

संकष्टी चतुर्थी : मित्रांनो उद्या 4 ऑगस्ट संकष्टी चतुर्थी. उद्या आपल्या दोन कापुर वडी सोबत अशी एक वस्तू जाळायची आहे त्यामुळे घरातील नकारात्मकता , नजर दोष , वास्तू दोष घालवण्यासाठी , घरातील अलक्ष्मी बाहेर जाऊन घरात माता लक्ष्मी यावी यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे.

लहान मुलांची अभ्यासात प्रगती होत नसेल , कधी कधी इतकी संकटे दुःख येतात कि एका संकटातून बाहेर पडत नाही कि दुसरं संकट दारात येऊन उभं राहत. आपल्या घरात नकारात्मकता इतकी वाढलेली असते कि त्याचा परिणाम घरातील व्यक्तींवर , त्यांच्या मनावर आपल्या नकळत होत असतो.

अशा नकारात्मक ऊर्जेमुळे घरात आपसांत वाद विवाद व्हायला सुरवात होते. भांडणे होतात सोबतच एकमेकांविषयी गैरसमज निर्माण होतात. घरात लहान बाळ असेल तर ते सतत रडत राहत किंवा मोठ्या मुलांची अभ्यासात प्रगती होत नाही किंवा शिक्षण पूर्ण झालंय पण मनासारखी नोकरी मिळत नाही अशा कारणांमुळे चिडचिड होते. एक ना अनेक समस्या या नकारात्मकतेमुळे घरात निर्माण होतात.

हे वाचा : अधिक महिन्यात या गोष्टींचे दान करा, करोडपती होण्यापासून कोणीच रोखू शकणार नाही.

नवरा बायकोची भांडणे होतात , छोट्या मोठ्या गोष्टींवरून किरकिर होते या सर्व गोष्टी घडू नयेत म्हणून तुम्हाला हा सोप्पा उपाय करायचा आहे. मित्रांनो महिन्याला संकष्टी चतुर्थी येत असते. हा उपाय संध्याकाळी आपल्याला करायचा आहे. अधिक महिन्यात आपण भगवान विष्णूंची सेवा करतो कारण हा महिना त्यांना समर्पित आहे.

चतुर्थी तिथी ही गणपती बाप्पांना समर्पित असते. मित्रांनो हा उपाय खूपच प्रभावी आहे याचा अनुभव तुम्हाला नक्कीच येईल. या दिवशी व्रत केले तरी चालेल किंवा फक्त सेवा केली तरी चालेल. या दिवशी सर्वप्रथम तुम्हाला गणपती बाप्पांची पूजा करायची आहे. 21 मोदकांचा नेवैद्य गणपती बाप्पाना अर्पण करायचा आहे. सोबतच न चुकता अथर्वशीर्ष पठण करायचं आहे.

आपली कठीणातली कठीण इच्छा पूर्ण व्हावी यासाठी हा उपाय करायचा आहे. आपल्याला सुक्या खोबऱ्याचा अर्धा तुकडा घ्यायचा आहे. आपण जे दुकानातून सुके खोबरे आणतो त्यातली अर्धी वाटी घ्यायची आहे. त्यामध्ये दोन भीमसेनी कापराच्या वड्या आपल्याला टाकायच्या आहेत. मित्रांनो भीमसेनीच कापूर घ्यायचा आहे कारण यात घरातील नकारात्मक गोष्टी बाहेर काढण्याची शक्ती असते.

हे वाचा : अशा पुरुषांनी चुकूनही वयाने लहान असलेल्या मुलीशी लग्न करू नये.

या कापराच्या वड्या पेटवायच्या आहेत. हा उपाय तुम्ही देवघरात बसून करू शकता किंवा घरात जास्त गोंधळ असेल आवाज असेल तर हा उपाय तुम्ही दुसऱ्या खोलीत जिथे शांतता असेल तिथे बसून करू शकता. कापराच्या वडी सोबतच त्यात दोन लवंग टाकायच्या आहेत. लवंगा देखील घरातील नकारात्मक दूर करण्यासाठी उपयुक्त असतात.

हा कापूर जोपर्यंत जळत आहेत तोपर्यंत ओम श्री विघ्नहरताय नमः , ओम श्री विघ्नहरताय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. कापराच्या जळण्याने आपल्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा जाळून जाऊदे अशी बाप्पांच्या चरणी इच्छा व्यक्त करायची आहे. जिथे आपण पूजेचे निर्माल्य टाकतो तिथे हा खोबऱ्याचा तुकडा आणि जळलेली लवंग टाकू शकता.

हे जर शक्य नसेल तर वाहत्या पाण्यामध्ये सोडले तरी चालेल. मित्रांनो उद्याची संकष्टी हि अधिक महिन्यातली आहे त्यामुळे हा उपाय तुम्ही नक्की करा. ओम श्री गणेशाय नमः श्री स्वामी समर्थ.