Join Our WhatsApp Group

मन अशांत झालय ? डोक्यात टेंशन असेल तर इकडे लक्ष दे. स्वामी स्वतः येऊन तुझं आयुष्य सुखी करतील.

श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रेमळ भक्तांनो तुमचं मनापासून स्वागत आहे. स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू देत आणि नेहमी तुम्हाला आनंदात सुखात आणि हसत खेळत ठेवू दे ही स्वामी चरणी मनापासून प्रार्थना.

श्री स्वामी समर्थ महाराजांना त्रिवार वंदन करून आजच्या सुंदर लेखाला सुरुवात करूया. भगवंत चिंतनात अखंड दंग असणारा एक गोसावी तीर्थयात्रा करत थेट रामेश्वरापर्यंत पोहोचला. अनेक दिवसांच्या प्रवासामुळे तो खूप थकला होता. त्याच्या अंगात प्राण शिल्लक नव्हते.

10 मिनिटांमध्ये आनंदाच्या बातमीचा कॉल येईल ज्या घरात हा स्वामी संदेश वाचला जाईल.

त्यातच या गोसाव्याला जलोदर झाला. त्यामुळे अंगातली शक्ति क्षीण होत चालली होती. उठून बसायची देखील ताकद राहिली नव्हती. काय करावं त्याला काहीच कळत नव्हतं. तो परमेश्वराची करुणा करू लागला आणि एके दिवस त्याला स्वप्नदृष्टांत झाला.

एक तेज पुंज संन्यासी स्वप्नात येऊन गोसाव्याला म्हणाला की अक्कलकोटला स्वामींकडे जा. तुला नक्कीच बरे वाटेल , गोसाव्याला लगेच जाग आली बाहेर पाहिलं तर अजून काळोखच होता. त्याने उठायचा प्रयत्न केला, उठून उभा राहिल्यावर त्याच्या पुन्हा लक्षात आले की पाऊल टाकताना काही त्रास होत नाहीये.

गोसाव्याला आनंद झाला. परमेश्वराची कृपा झाली या आनंदात त्याने रामेश्वर सोडले आणि अक्कलकोटला जायचा रस्ता नीट विचारून थोडे थोडे अंतर तो कापू लागला. अक्कलकोटात येऊन पोहोचला तेव्हा स्वामी एका नवीन बांधलेल्या विहिरीच्या कठड्यावर बसले होते.

स्वामींच्या अवती भवती स्वामी भक्तांची प्रचंड गर्दी उसळली होती. स्वामींपाशी पोहोचायचे कसे हा गोसाव्याच्या पुढे प्रश्न उभा राहिला. स्वामींनी गोसाव्याला पाहिले आणि सेवेकऱ्यांना सांगितले कि या गोसाव्याला इकडे घेऊन या.

गोसाव्याला आश्चर्य वाटले कि स्वामींनी या उसळलेल्या गर्दीत नेमके आपल्यालाच कशी काय हाक मारली. स्वामीं पाशी तो लगेचच जाऊन पोहोचला त्याने स्वामींच्या चरणांवर आपला भक्तिमाथा ठेवला. त्या क्षणी त्याच्या सर्वांगातून वीस सळसळत गेली , सर्वांग पिसासारखे हलके होत गेले. त्याने वर पाहिले तेव्हा त्याला भगवंताचे साकार दर्शन झाले.

गोसाव्याला खूप आनंद झाला तो स्वामींकडे पाहतच राहिला. तेव्हा त्याच्या लक्षात आले की स्वप्नदृष्टांत स्वामींनी घडवला आणि आपल्याला अक्कलकोटला बोलावून घेतले. स्वामींनी गोसाव्याला सांगितले, रोज कडुलिंबाचा थोडा थोडा पाला खा तुझ्या पोटाची स्वच्छता तो पाला करेल.

ज्या महिलांचे हे 5 अंग मोठे असतात अशा महिला भाग्यशाली असतात.

आठच दिवसात तू खडखडीत बरा होशील. स्वामींची गोसाव्यावर पूर्ण कृपा झाली होती कारण गोसाव्याची तपश्चर्या पूर्ण झाली होती. अनेक जन्मांची श्री दत्त उपासना आज फळाला आली होती. प्रेमळ स्वामी भक्तांनो आपल्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती असेल तर आपण सतत नामस्मरणात दंग राहायला हवे.

सर्वभूते परमेश्वर आहे हे सत्य स्वीकारून प्रत्येकाने प्रेमाने जगायला हवे. निरपेक्ष प्रेम करायला हवे तरच परमेश्वराची आपल्यावर कृपा होते. अवतारी पुरुष आपल्या आयुष्यात आपोआप येतो आणि आपले आयुष्य समृद्ध करून जातो.

हा प्रत्यक्ष अनुभव आपल्याला घ्यायचा आहे. म्हणूनच तुम्ही एकच करा सतत परमेश्वराच्या नामात राहा. जेव्हा आपलं मन अशांत असतं, बुद्धी गोंधळलेली असते तेव्हा परमेश्वराचं नामस्मरण करावे. त्याचं नाव हे असं जहाज आहे जे खवळंलेल्या भव सागरात तुम्हाला पैलतीरावर नेऊन पोहोचवत.

श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.