Join Our WhatsApp Group

श्री स्वामी समर्थ : येत्या सोमवार पर्यंत आनंदाच्या बातमीचा कॉल येईल. पाहून दुर्लक्ष करू नकोस.

श्री स्वामी समर्थ : आज हा स्वामी संदेश पाहून दुर्लक्ष करू नकोस. तू वाचलास तर भाग्यवान ठरशील. मला माहित आहे तुम्ही सध्या कुठल्या परिस्थितीतून जात आहात.

अरे बाळा तुझा माझ्यावर विश्वास नाही आहे का ? मग नुसतं झुरत बसण्यापेक्षा मला हाक मारायची, मी आहे ना तुझ्या पाठीशी. तुला असे वाटते आहे का की स्वामी तुझं ऐकत नाही ? तुझे मन असे विचलित अशांत का झाले आहे ?

हे वाचा : अशा पुरुषांनी चुकूनही वयाने लहान असलेल्या मुलीशी लग्न करू नये.

अरे जीवनात कितीही मोठे प्रसंग आले तरी स्थिर रहा कारण स्थिर मनातच माझं प्रतिबिंब दिसेल. आणि मगच तुझे बोलणे तुझी प्रार्थना माझ्यापर्यंत पोहोचेल ना.

पहिलं तुझ्या मनातला तिरस्कार , राग शांत कर. विवेक बुद्धीने विचार करून निर्णय घेतला असशील तर मग मागे हटू नकोस ठाम रहा. तुझे कोणीही ऐकत नसेल तर जास्त ताण करून घेऊ नकोस, मला सांग.

हे वाचा : देव्हाऱ्यातील नारळाला कोंब आला तर शुभ असते कि अशुभ ? नारळाचे काय करावे ?

सुख हवे आहे असा अट्टाहास करू नकोस कारण प्रत्येक गोष्टीमध्ये सुख लपलेले आहे. फक्त तुझ्या बघण्याचा दृष्टिकोन बदल. जसं दुधामध्ये दही लपलेल असताना तसेच तू फक्त कर्म करत राहा खूप मेहनत घे तुझ्या कर्माने तुझे लपलेले सुख नक्कीच बाहेर येणार.

माझ्यावर विश्वास ठेव येणाऱ्या काळात मी तुझे जीवन पुढील स्तरावर नेणार आहे. जेथे तू खूप सुख अनुभवशील. स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आणि स्वामींना सदैव तुझ्याबरोबर ऐकण्यासाठी, पाहण्यासाठी तुला स्वामींची, देवांची नामस्मरण करताना कुठल्याही कर्माचा किंवा संसाराचा त्याग करण्याची गरज नाहीये.

तर तेच कर्म दिव्य आणि सफल होण्यासाठी माझ्या नावाचा आश्रय घे. नक्कीच ते कार्य सफल होईल. कुठल्याही कार्यामध्ये अडथळा राहणार नाही. जे करशील ते शुद्ध अंतकरणाने मनापासून कर. कोणाबद्दल मनामध्ये द्वेष ठेवून करू नकोस.

तुझी प्रत्येक कर्म माझ्यापर्यंत पोहोचेल. कर्म करताना त्याच्या परिणामाचा विचार कर त्यातून तूला शांती मिळेल आणि मगच पुढचं पाऊल उचल.