Join Our WhatsApp Group

देव्हाऱ्यातील नारळाला कोंब आला तर शुभ असते कि अशुभ ? नारळाचे काय करावे ?

आज आपण पाहणार आहोत देवघरातील कलशाच्या नारळाला कोंब आला, तडा गेला तर शुभ असते की अशुभ. त्या नारळाचे काय करावे ? मित्रांनो प्रत्येकाच्या घरी कुलदेवतेचा कलश हा असतोच आणि जर नसला तर नक्की कलश स्थापना करा. कुलदेवतेचा कलश हा प्रत्येकाच्या देव्हाऱ्यात असलाच पाहिजे. कुलदेवतेचा आशीर्वाद आपल्या सदैव पाठीशी राहतो.

कुलदेवता आपल्या कुळाचे रक्षण करत असते. तर आज आपण याच कलशा वरील नारळा विषयी बोलणार आहोत. मित्रांनो कोणाच्या नारळाला कोंब येते व कोणाच्या कलशा वरील नारळाला तडा जातो. तर मग यानारळाचे काय करावे असा प्रश्न प्रत्येकाला पडत असतो.

गुरुवारी जी व्यक्ती स्वामींचे हे उपाय करते ती कधीच गरीब राहत नाही

नारळाला कोंब आला तर शुभ असते कि अशुभ

हा प्रश्न पडणं साहजिकच आहे. तुम्ही कलशातील पाणी जमले तर रोज बदला आणि जर रोज बदलायला जमत नसेल तर आठवड्यातून दोन वेळा जरूर बदला. कलशाची पूजा दररोज करा. आपल्या देवघरातील कलशा वरील नारळाला कोंब फुटला तर तो नारळ कलशातून काढून घ्यावा व कलशा वरती दुसरा नवीन कुलदेवतेच्या नावाचा नारळ ठेवावा.

तो कोंब फुटलेला नारळ आपल्या अंगणामध्ये जागा असेल किंवा घराच्या आजूबाजूला जर जागा असेल तर एक खड्डा काढून लावावा किंवा आपल्या इथे जर जवळपास मंदिर असेल तिथे परवानगी असेल तर तिथे लावण्यासाठी द्यावा हे सर्वात शुभ आहे.

अशा पुरुषांनी चुकूनही वयाने लहान असलेल्या मुलीशी लग्न करू नये.

काही काही लोकांना खूप प्रश्न पडतात की कोंब आला आहे आता काय करावे ? आता शुभ होईल कि अशुभ होईल ? तर त्यांना आता समाधानकारक उत्तर मिळालेच असेल कि वाईट अशुभ असं काहीही होत नाही. सर्व काही शुभच होते. आता पाहूया कलश वरील नारळाला तडा गेला तर काय करावे.

तर तो नारळ काढून घेऊन पाण्यामध्ये प्रवाहित करावा व कलशावरती नवीन कुलदेवतेच्या नावाचा नारळ ठेवावा. तर आजची माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा.